पाळीव प्राण्यांची काळजी (फोटो सौजन्य- फेसबुक)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात घरी थांबण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात राज्य सरकारकने Unlock 1 नुसार नियमात शिथीलता आणत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याबाबत नवी मार्गदर्शक सुचना सुद्धा नुकतीच जाहीर केली आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या काळात पाळीव प्राण्यांना आता घराबाहेर चालण्यासाठी घेऊन जाण्यास त्यांच्या मालकांना परवानगी दिली आहे. बॉम्बे हायकोर्टाला याबाबत राज्य सरकारने सांगितले आहे.

1 जून रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आले होते. त्यामध्ये पोलिस व नागरी अधिका्यांना मालकांना त्यांचे पाळीव प्राण्यांना चालण्यासाठी घेऊन जाण्यास मनाई करण्यात आल्याचे सांगितल्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले. सरन्यायाधीश दीपंकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात पुणे येथील रहिवाशांनी तिच्या कुत्र्यांना बाहेर नेण्याची परवानगी मिळावी यासाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी केली जात होती.(Cyclone Nisarga चा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याला 100 कोटींंची तातडीची मदत जाहीर, पंचनाम्यानंतर भरपाईचं स्वरूप ठरणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा) 

अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया यांनी असे म्हटले होते की, पाळीव प्राण्यांच्या मालकांना चालण्यासाठी घेऊन जाण्यास परवानगी देण्यात यावी. मात्र त्यावेळी कोणतीही दुर्घटना होईल याबाबत काळजी घेण्याचे ही त्यांनी म्हटले होते. तर 1 जून रोजी जारी करण्यात आलेला AWBI चे परिपत्रक शुक्रवारी केंद्र सरकारने हायकोर्टासमोर ठेवले. वकील हर्षवर्धन भेंडे यांनी दाखल केलेल्या याचित असे म्हटले की, पुण्यातील काही पोलीस स्थानकांनी Arbitrary Directions जारी करत पाळीव कुत्र्यांना घराबाहेर घेऊन जाण्यास बंदी घातली होती.

तसेच पोलिसांकडून आजारी प्राण्यांची रुग्णवाहिका आणि पाळीव प्राण्यांची टॅक्सी क्लिनिक पर्यंत पोहचण्यासाठी अडवली जात होती. तसेच अशा प्रकरणी गाड्यांना यासाठी पास देण्यासाठी सुद्धा देण्याचे पोलिसांकडून नाकारण्यात येत असल्याचे भेंडे यांनी पुढे स्पष्ट केले आहे. मात्र हायकोर्टाच्या दुसऱ्या खंडपीठाने प्राण्यांना दवाखान्यात घेऊन जाताना वहाने अडवू नयेत असे निर्देशन सरकारला दिले होते. त्यानंतर आता पाळीव प्राण्यांना घराबाहेर घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.