Dog Maharaj | Facebook

विठू नामामध्ये तल्लीन होत लाखो वारकरी आषाढी एकादशी साठी पंढरपूर मध्ये दाखल होतात. यंदा आषाढी एकादशीच्या वारीमध्ये कमलेश कुंभार यांच्यासोबत त्यांचा पाळीव कुत्रा देखील आला होता. कुंभार मागील 30 वर्ष वारी चालत आहेत. यंदाच्या वारीत कोल्हापूर मध्ये नानीबाई चिखली मधून पंढरपूरला जात असताना या कुत्र्याची आणि त्याच्या मालकाची चुकामूक झाली. कुंभार कुटुंबाने खूप शोध घेतला पण तो त्यांना सापडेना. कुंभार कुटुंब घरी परत आले. पण आपल्या 'महाराज' (पाळीव कुत्र्याचे नाव ) चा शोध घेण्यासाठी त्यांनी सोशल मीडीया मध्ये पोस्ट टाकली.

आठवडाभर 'महाराज' चा शोध घेतल्यानंतर त्यांनीही तो परत येण्याची आशा सोडली होती. पण अचानक दोन दिवसांपूर्वी तो कुत्रा आपल्या मालकाकडे परत आला. 250 किमीची पायपीट करत तो पुन्हा घरी आल्याने घरातील आणि गावातील लोकांचा देखील आनंद द्विगुणित झाला. त्यांनी 'महाराज' ला हार घातले, मिरवणूक काढली. सध्या त्याचे फोटो सोशल मीडीयात शेअर केले जात आहेत.

व्दादशीला पंढरपुर मधून दिंडीतले वारकरी यमगर्णीकडे परतणार असल्याने सर्व वारकरी परतीच्या तयारीस लागले होते. परतीचा प्रवास वाहनातून असल्याने ' महाराज' लाही वाहनात घेण्याचा सर्वांचा विचार होता. पण पंढरपुरात यात्रेच्या गर्दित तो चुकला. सर्व वारकर्यांनी शोधूनही तो  सापडला नाही. मालकासह सर्व वारकर्‍यांना वाटले की तो पंढपुरमधेच राहीला, पण 2 दिवसांपूर्वी तो 190 कि.मी. पायी प्रवास करत पंढरपुरहुन यमगर्णी गावात दाखल झाला. गावात आल्यावर सर्वानी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी त्याची विठ्ठल मंदिरापासुन ते श्री.ज्ञानदेव कुंभार यांच्या घरापर्यंत मिरवणुक काढुन स्वागत केले. नक्की वाचा: Heart-Touching Video: पाळीव कुत्र्याचा हृदयस्पर्षी व्हिडिओ, अनेकजण गेले हेलावून .

कुंभार कुटुंब महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील निपाणी जवळ असलेल्या यमगरणी गावामध्ये राहते. यापूर्वी कुंभार कुटुंबासोबत ज्योतिबाच्या दर्शनासाठी देखील महाराज गेला होता.