आषाढी एकादशी 2019 (Ashadhi Ekadashi) साठी वारकरी पंढरीकडेकडे निघाले आहेत. पुण्यात दाखल असलेल्या तुकोबा आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालख्या आज (28 जून) हडपसरच्या दिशेने सरकल्या आहेत. यंदा 12 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा आहे. त्याआधी वारकरी आणि विठ्ठल रुक्मिणीचे भाविक पंढरपुरात दाखल होणार आहेत. विठूरायाचे दर्शन घेण्यापूर्वी अनेक भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करतात. यंदा भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने फिरते चेंजिंग रूम्स उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितले आहे. आषाढी वारी मध्ये माऊलींच्या पालखीचं आज प्रस्थान; कशी आणि कोणी सुरू केली प्रथा?
यंदा आषाढी वारी 2019 ची सोय कुंभमेळ्याच्या धर्तीवर केली आहे. मंदिर प्रशासनाकडून महिलांसाठी चंद्रभागा नदीजवळ स्नान केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी खास चेजिंग रूम उभारणार आहेत. एकावेळेस 10 महिला कपडे बदलू शकतात. सुमारे 20 चेजिंग रूम्स सज्ज ठेवणार आहेत.
भीमा नदी पंढरपूर जवळून वाहताना चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते. त्यामुळे या नदीला चंद्रभागा असं म्हणतात.