प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

पंढरपुर (Pandharpur) येथे एका अल्पवयीन मुलीला दारु पाजून तिच्यावर चार नराधमांनी बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पीडित मुलीवर बलात्कार केल्यानंतर या चार जणांनी तिला धमकावत याबद्दल कोणाला सांगित्यास रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करु अशी तंबी दिली.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही या चार आरोपींपैकी एका मुलाची मैत्रीण होती. या मुलीला एका अनोखळी ठिकाणी बोलावत तिला दारु पाजली आणि तिच्यावर बलात्कार केला. यामधील एक तरुण या घटनेचा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता. मात्र या आरोपींनी तिला धमकावल्यामुळे तिने कोणाला आधी सांगितले नाही. मुलीच्या या वागण्याचा फायदा घेत या आरोपींनी तिच्यावर बऱ्याच वेळा बलात्कार केला.(उस्मानाबाद: स्वातंत्र्य दिनी मध्यरात्री डान्सबारमध्ये छमछम, बारबालांवर पैशांचा पाऊस)

मात्र अखेर मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला असता तातडीने पोलिसात धाव घेत याबद्दल गुन्हा दाखल केला. तसेच पीडित मुलीने घडलेली घटनेचे पोलिसांना स्पष्टीकरण देत आरोपींनी पैशांची मागणी सुद्धा केली असल्याचे सांगितले. या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून अद्याप एकजण पसार झाला आहे.