प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

15 ऑगस्ट रोजी देशभरात 73 व्या स्वातंत्र्य दिनाचा (Independence Day) आनंद साजरा केला जात होता. मात्र उस्मानाबाद (Osmanabad) येथे याच दिवशी मध्यरात्री डान्सबार सुरु असल्याचा प्रकार समोर आला. या डान्सबारमध्ये बारबालांवर पैशांची उधळण सुरु असल्याचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे. पण पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली असून तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वातंत्र्य दिनी ड्राय डे असताना ही डान्सबार सुरु करण्यात आला होता. या डान्सबारमध्ये आलेल्या एक तरुण हा सर्व प्रकार पाहत असताना बारमालकाने बारबालांवर तो पैसे उधळत नसल्याने त्याला मारहाण केली. यावर मारहाण केलेल्या तरुणाने पोलिसात धाव घेत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.(लातुर: शिक्षकांचा दारु पिऊन शाळेत धिंगाणा, पोलिसांकडून अटक)

वस्तीत असलेला हा डान्सबार बंद करावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी स्वातंत्र्य दिनी डान्सबार सुरु असल्याचा प्रकाराचा उल्लेख टाळत हाणामारी झाल्याचे सांगितले. यावरुन पोलिसांकडे स्पष्टीकरण मागितले असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. पोलिसांच्या अशा वागण्यामुळे या डान्सबारला पोलिसांचा पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.