विधानपरिषदेतील आमदार आणि भाजप नेते रणजीतसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil corona) यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला आहे. रणजीतसिंह मोहते पाटील यांनी आपल्या ट्विटह हँडलवरुन ही माहिती दिली आहे. दरम्यान, रणजीतसिंह हे कोरोना संक्रमित झाल्यामुळे भाजपची अडचण होऊ शकते. सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (Pandharpur By-Election) सुरु आहे. या निवडणुकीत भाजपने समाधान आवताडे (BJP Samadhan Autade) यांन उमेदवारी दिली आहे. अवताडे यांच्या निवडणू प्रचारात रणजीतसिंह यांचा सक्रीय सहभाग होता. परंतू, आता महत्त्वाच्या नेत्यालाच कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान एक चांगला कार्यकर्ता, नेता उपलब्ध नसल्याने भाजपची अडचण होऊ शकते.
रणजीतसिंह मोहते पाटील यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागली. त्यानंत त्यांनी आपली कोरोना व्हायरस चाचणी करुन घेतली. चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती ट्विटरवरुन देताना रणजीतसिंह मोहते पाटील यांनी म्हटले की, 'माझी कोरोनाची टेस्ट आज पाॅझिटीव्ह आली आहे,त्यामुळे मी क्वारंटाईन होत आहे.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की, आपणही आपली कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी व स्वतःची काळजी घ्यावी.' (हेही वाचा, Pandharpur By-Election: कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश जवळपास नक्की, भाजपला धक्का)
रणजितसिंह मोहिते पाटील यांना सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात विशेष महत्त्व दिले जाते. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र आहेत. या आधी 2009 ते 2012 या काळात ते राज्यसभेवर खासदार होते. सध्या ते विधानपरिषदेवर भाजपचे आमदार आहेत. शिवाय ते राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्षपदही त्यांनी काही काळ भूषवले आहे.
माझी कोरोनाची टेस्ट आज पाॅझिटीव्ह आली आहे,त्यामुळे मी क्वारंटाईन होत आहे.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की, आपणही आपली कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी व स्वतःची काळजी घ्यावी.
— Ranjitsinh Mohite Patil (@Ranjitsinh05) April 7, 2021
राजकारणाची सुरुवात काँग्रेस पक्षात आणि प्रदीर्घ काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घालवल्यावर विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात होता. मोहिते पाटील घराण्याचे पक्षांतर भाजपसाठी मोठा फायदा तर राष्ट्रवादीसाठी धक्का ठरले होते.