Pandharpur By-Election: कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश जवळपास नक्की, भाजपला धक्का

कल्याण काळे आणि भाजप यांच्यातील दुरावा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतची त्यांची जवळीक गेल्या काही काळापासून अधिकच वाढली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमातही राष्ट्रवादीच्या मंचावर कल्याण काळे यांची प्रतिमा असलेला बोर्ड झळकला होता.

Pandharpur By-Election: कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश जवळपास नक्की, भाजपला धक्का
Kalyanrao Kale | (Photo Credits-Facebook)

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणूक (Pandharpur By-Election) प्रचार ऐन भरात आला आहे. राष्ट्रवादीकडून (NCP) भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) तर भाजप (BJP) कडून समाधान अवताडे (Samadhan Awatade) रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांचा प्रचार जोमात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपला धक्का दिला आहे. भाजपचे नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) हे राष्ट्रवादी काग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. येत्या गुरुवारी (8 एप्रिल 2021) कल्याणराव काळे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

कल्याण काळे आणि भाजप यांच्यातील दुरावा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतची त्यांची जवळीक गेल्या काही काळापासून अधिकच वाढली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमातही राष्ट्रवादीच्या मंचावर कल्याण काळे यांची प्रतिमा असलेला बोर्ड झळकला होता.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके तर भाजप कडून समाधान अवताडे रिंगणात आहेत. दरम्यान, मतविभागणी टाळण्यासाठी भाजपने पक्षांतर्गत दोन्ही गट एकत्र करुन उमेदवार दिला आहे. त्यामुळे भाजपचे पारडे जड झाल्याची चिन्हे होती. मात्र, राष्ट्रवादीने ऐनवेळी हादरा देत कल्याणराव काळे यांना आपल्याकडे खेचल्याचे चित्र आहे. (हेही वाचा, Pandharpur by-Election 2021: भाजपला धक्का, कल्याणराव काळे राष्ट्रवादीच्या वाटेवर; पंढरपूर विधानसभा मतदारसंघात चुरस वाढली)

दरम्यान, कल्याणराव काळे यांच्यासोबत स्नेहभोजन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काळे यांच्या फार्महाऊसवर जाणार असल्याचे समजते. कल्याणराव केळे हे सोपापूर जिल्ह्यातील एक दमदार प्रस्थ आहे. त्यांचा सोलापूर, मंगळवेढा, आणि इतरही काही तालुक्यांमध्ये मोठा प्रभाव आहे.त्यामुळे काळे यांनी खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यास भाजप अडचणीत येऊ शकतो.

(The above story first appeared on LatestLY on Apr 06, 2021 05:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).