Bhagirath Bhalke, Samadhan Autade | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनामुळे लागलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक 2021 (Pandharpur Mangalwedha Assembly By-Election) मध्ये काय होईल याबात अनेकांना उत्सुकता आहे. राष्ट्रवादीचे भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) आणि भाजपचे समाधान अवताडे (Samadhan Autade) यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजप (BJP) अशा दोन्ही प्रमुख पक्षांनी आघाडी घेतली. कोरोना व्हायरस महामारीचे संकट असतानाही दोन्ही पक्षांनी प्रचंड गर्दी करत प्रचारसभा घेतल्या. पडद्यावरचे आणि पडद्यामागचे राजकारण केले. अजित पवार ( Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil ) हे राष्ट्रवादीचे तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे भाजचे महाराष्ट्रातील पहिल्या फळीतील नेते मैदानात उतरले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप उमेदवारांच्या प्रचाराची उत्सुकता शिगेला पोहोचली. दोन्ही पक्षांनी कारणाशिवाय ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यामुळे सहाजिकच निकालाबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, जनमताचा कानोसा म्हणाल तर या निवडणुकीत राष्ट्रवादी काटावर पास तर भाजप थोडक्यात बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात ही शक्यता खरी की खोटी हे कळायला 2 मे हा दिवसच उजाडावा लागेल हे नक्की.

पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, असम आणि पुडुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसोबत पंढरपूरमध्येही पोटनिवडणूक पार पडली. आता या निवडणुकीचा निकाल येत्या 2 मे 2021 या दिवशी लागणार आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा पोटनिवडणुकीचा आज शेवटचा टप्पा होता. शेवटच्या टप्प्यासाठी मतदान कालावधी संपताच विविध संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल्सचे अंदाज जाहीर केले. विविध राज्यांतील एक्झिट पोल्सचे अंदाज येऊ लागल्याने स्थानिक राजकारणात रुची असलेल्या अनेकांना पंढरपूर पोटनिवडणुकीत काय होईल? याबाबत उत्सुकता होती. (हेही वाचा,  Pandharpur-Mangalwedha Assembly By-Elections: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा)

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत काय होऊ शकेल असे विचारले असता या मतदारसंघातील अनेक जाणकार सांगतात यंदा काट्याची टक्कर आहे. राष्ट्रवादीचे भगिरत भालके आणि भाजपचे समाधान औताडे हे दोघेही साखर कारखान्याशी संबंधित आहेत. तरीही शेतकऱ्यांचे ऊसाचे बील का थकले आहे याबाबत दोघेही बोलत नव्हते. या मतदारसंघात ऊस उत्पादकांची संख्या मोठी आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इथे उमेदवार दिला आहे. स्वाभिमानीने ऊस शेतकऱ्यांचा बिलाचा मुद्दा उचलून धराला आहे. त्यामुळे मतदार नेमका कोणाला कौल देतो हे ठामपणे सांगता येत नाही. त्यातूनही खोदून विचारलेच तर काही अभ्यासू सांगतात राष्ट्रवादी काँग्रेस काटावर का होईना ही जागा काढणार. भाजपला थोडक्यात ही जागा गमवावी लागेल.

दरम्यान, या निवडणुकीत अजित पवार यांनी 5 दिवस पंढरपूरात तळ ठोकला होता. तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचेही मतदारसंघातील मुक्काम वाढला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान अवताडे यांच्यापेक्षा अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनीच ही निवडणूक अधिक प्रतिष्ठेची केली होती. 2 मे या दिवशी कोरोना नियमांचे कडक पालन करत मतमोजणीसाठी होणार आहे. त्यामुळे 14 टेबलांवर ही मतमोजणी होणार आहे. सहाजिकच निकाल यायला विलंब लागल्यास आश्चर्य वाटायला नको.