Suicide | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पबजी (PUBG) खेळण्याचं वेड एका 16 वर्षीय मुलाला महागात पडलं आहे. या ऑनलाईन खेळाच्या (Online Games) नादात हा मुलगा इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरून खाली पडला आहे. सध्या त्याच्यावर पालघर (Palghar)  मध्ये रिलीफ रुग्णालयात (Relief Hospital) उपचार सुरु आहेत.

पालघरच्या शिरगावमध्ये रविवार (15 मे) दिवशी शादान शेख हा 16 वर्षीय युवक पबजी खेळताना कोसळला आहे. शादान आपल्या मित्रांसोबत शिरगाव येथील एका अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीवर आला. तो या खेळात इतका गुंतला की तो दुसऱ्या मजल्यावर आहे याचादेखील त्याला विसर पडला. खेळण्यात गुंग असलेला शादान अचानक खाली पडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आहे.

पबजी या ऑनलाईन खेळाचं वेड किशोरवयीन मुलांमध्ये प्रचंड आहे. या खेळाच्या नादापायी अनेक अप्रिय घटना समोर आल्या आहे. काहींनी यामधून नैराश्य आल्याने आत्महत्या केल्याच्याही घटना मागील काही दिवसांत समोर आल्या आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी असाच पबजी मध्ये गुंतलेला 12 वर्षीय मुलगा खेळाच्या तंदरीमध्ये असताना नांदेड हून नाशिकला आल्याची बाब समोर आली होती. खेळता खेळता हा मुलगा ट्रेनमध्ये बसला होता. नंतर कुटुंबियांच्या तक्रारीनंतर शोधाशोध झाल्यानंतर या मुलाचा तपास लागला. नाशिक स्टेशन वर त्याची कुटुंबियांसोबत भेट झाली. हे देखील नक्की वाचा: PUBG गेमच्या नादात मुलाने घरातील तिजोरी केली खाली, तब्बल 3 लाखांची रोकड लंपास .

स्मार्टफोनचा वाढता अतिवापर मुलांसाठी धोक्याची घंटा बनत चालला आहे. यामुळे मुलांच्या शारिरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावरही मोठे दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे मुलांना किती स्मार्टफोनचा वापर करायला द्यावा याची खबरदारी घेणं पालकांची मोठी जबाबदारी बनली आहे.