Mumbai Traffic Update: अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक श्री. सिध्दीविनायक मंदिरात गणरायाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे दि. 25 जून 2024 रोजी श्री. सिध्दीविनायक मंदीर आणि आसपासच्या परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. परिणामी वाहतूक कोंडी टाळण्याकरिता ट्राफिक पोलिसांकडून परिसरातील मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. (हेही वाचा: Angarki Sankashti Chaturthi 2024 Moon Rise Timings: अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी व्रताची सांगता करण्यासाठी जाणून घ्या चंद्रोदयाच्या वेळा!)
पोस्ट पहा-
दि. २५ जून २०२४ रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या अनुषंगाने श्री. सिध्दीविनायक मंदीर व आसपासच्या परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. परिणामी वाहतूक कोंडी टाळण्याकरिता सदर परिसरातील मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहे. pic.twitter.com/Qv19ZF5IqL
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) June 25, 2024
- गोखले रोड दक्षिणवरुन पोर्तुगीज चर्च जंक्शन येथून एस. के. बोले मार्गावर उजवे वळण बंद.
- गोखले रोड उत्तर वरुन जाखादेवी जंक्शन येथून दत्ता राऊळ आणि एन. एम. काळे मार्गावर डावे वळण बंद.
- एस. के. बोले मार्गावर आगार बाजार येथून दक्षिणेकडे सिध्दीविनायक मंदीराकडे जाण्यास प्रवेश बंद.
- एस. व्ही. एस रोड वरुन सिध्दीविनायक मंदीर जंक्शन येथून एस. के. बोले मार्ग, आगार बाजार, पोर्तुगीज चर्च येथे जाण्याकरिता एक दिशा मार्ग राहील.
- सयानी रोड वरील लेनिन ग्राड चौक येथून शंकर घाणेकर मार्गावर जाण्यासाठी उजवे व डावे वळण बंद, सिध्दीविनायक मंदीर व आसपासच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना आवश्यकतेनुसार इच्छित स्थळी जाणे करीता परवानगी देण्यात येईल.
दरम्यान, श्री गणेशाचे दर्शन सोमवारी मध्यरात्री 1 वाजून 30 मिनिटांपासून ते पहाटे 3 वाजून 15 वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर काहीकाळ दर्शन थांबवून नंतर पहाटे 3 वाजून 50 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत दर्शन पुन्हा सुरू करण्यात आले. दुपारी 12 वाजून 30 मिनिटांपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन न थांबता घेता येणार आहे. त्यानंतर, संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील.