किशोरी पेडणेकर । PC: Twitter/ANI

मुंबई (Mumbai) मध्ये आगामी बीएमसी निवडणूकांच्या (BMC Elections) पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) पक्षामध्ये 'विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट' देण्याबाबत काही चर्चा सुरू होत्या आज त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देताना 'बीएमसी निवडणूकांमध्ये तिकीट वाटपामध्ये वयोमर्यादा कमी करण्यावर कोणताही निर्णय झालेला नाही पण आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे क्रिमिनल रेकॉर्ड्स पाहून तिकीट ठरवणार असल्याचं म्हणाल्या आहेत. सध्या तिकीट वाटपावरून ज्या बातम्या फिरवल्या जात आहेत त्याच्याद्वारा ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मनात पक्षाविषयी रोष उत्पन्न करुन आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे सामर्थ्य कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलं आहे.

किशोरी पेडणेकरांनी यावेळी बोलताना मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत तरुण नेत्यांनी संधी दिली जाणार असल्याच्या चर्चा देखील फेटाळून लावल्या आहेत. मात्र आगामी बीएमसी निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली लढली जाणार आहे. आदित्य जे निर्णय घेतील, ते पक्षाच्या हिताचेच असतील, असे देखील किशोरी पेडणेकर यांनी नमूद केले आहे. नक्की वाचा: BMC Elections 2022: ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो, तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा- उद्धव ठाकरे.

ANI Tweet

आदित्य ठाकरेंनी देखील 9 जानेवारी दिवशी ट्वीट करत तिकीट वाटपाबद्दलच्या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे. 'विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले २-३ दिवस मी काही बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं' असे त्यांनी ट्वीट मध्ये नमूद केले आहे.

मुंबई, ठाणे महापालिकेत शिवसेनेचे वर्चस्व राहिलं आहे. यामध्ये 60% पेक्षा अधिक नगरसेवक हे 50 वर्षापेक्षा कमी आहेत. त्यामुळे आता पक्षाकडून तिकीट वाटपादरम्यान 50 पेक्षा जास्त वय असलेल्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, पन्नाशीच्या आसपास असलेल्या तरुण उमेदवारांना संधी देता येईल का यासंबंधी पक्षात खल सुरू झाला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधीच्या सूचना पक्षातील काही नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.