BMC Elections 2022: ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो, तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा- उद्धव ठाकरे
CM Uddhav Thackeray on BMC | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई महापालिका निवडणूक (BMC Elections 2022) डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागा असे आदेश शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना दिला आहे. मुंबईतील जवळपास 227 शिवसेना, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक आमदार आणि खासदारांसोबत शिवसेना पक्षप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत माझ्यावर होणाऱ्या वैयक्तीक टीकेला मी संयमाने घेत आहे. ज्यांना करुन दाखवायचे ती मी त्याच वेळी करुन दाखवत असतो, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य केले. तसेच, तुम्ही आता निवडणुकीच्या कामाला लागा, असेही उद्धव ठाकरे शिवसैनिकांना दिले.

राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ते जनते पर्यंत पोहोचवा. प्रामुख्याने पाचशे स्वेअर फुटाखालील घरांचा मालमत्ता करत माफ केला आहे. सरकारचा हा निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा. लोकांना समजावून सांगा. लोकांच्या विकासकामाची पोचपावती मिळायला हवी, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगीतले. (हेही वाचा, Property Tax Exemption In Mumbai: मविआ सरकारकडून नववर्षाचे गिफ्ट, मुंबईकरांचा 500 चौरस फुटाखालील घरांचा मालमत्ता कर माफ)

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलो आहे. त्यामुळे माझ्यावरील टीका संयमाने घेतो आहे. वैयक्तीक टिकेलाही मी शांतपणेच घेतो आहे. ज्यांना दाखवायचे त्यांना मी त्याच वेळी करुन दाखवतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागा. केलेल्या कामाची पोचपावती मिळायला हवी, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुखांनी शिवसैनिकांना दिला.

या बैठकीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थीत होते, त्यांनी सांगितले की, आपली कामे लोकांना समजून सांगा, मोठमोठी होर्डिंग्ज लावू नका. होर्डिंग्ज लावणे लोकांना आवडत नाही.