Image used for representational purpose only (Photo Credits: Wikimedia Commons, Lakun.patra)

देशात दिवसेंदिवस गाड्यांचे प्रमाण इतके वाढत चालले आहे ज्यामुळे ट्रॅफिक जॅम, वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण यांसारख्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. लोकांची बदलती लाईफस्टाईल दुचाकी वाहनांसोबत चार चाकी वाहनांची संख्या देखील वाढत चालली आहे. परिणामी ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होत असल्याने सर्रासपणे गाड्यांच्या हॉर्नचा सतत वापर केला जातो. घाईत असताना रस्ता लवकरात लवकर पार करुन निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी गाड्यांचे हॉर्न सतत वाजवले जातात. ज्यामुळे ध्वनीप्रदूषणाचा धोका निर्माण होतो. या गोष्टीला आळा घालण्यासाठी पुण्यात (Pune) उद्या 'नो हॉर्न' (No Horn) दिवस साजरा केला जाणार आहे. उद्या (12 डिसेंबर) पुण्यात गाड्यांच्या हॉर्नला एक दिवस विश्रांती दिली जाणार आहे.

लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार, पुण्यात सर्वाधिक हॉर्न वाजवला जातो असे निदर्शनास आले आहे. छोट्या रस्त्यांमुळे आणि रहदारीमुळे पुणेकराला ट्रॅफिक जॅममुळे रोज 2-3 तास वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत भविष्यात निर्माण होणा-या समस्यांना आळा घालण्यासाठी उद्या 'नो हॉर्न' दिवस साजरा केला जाणार आहे.हेदेखील वाचा- मुंबई: E-Challan न भरल्याने जवळपास 2 हजार Driving License रद्द

नो हॉर्न’ या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी लाईफ सेव्हिंग फाउंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि पुणे पोलीस वाहतूक विभागातर्फे एक दिवस हॉर्नला पूर्ण विश्रांती अशी संकल्पना राबविण्यात येत आहे.

शनिवारी दुपारी बारा वाजता प्रातिनिधिक स्वरूपात टिळक चौक येथे जनजागृतीपर कार्यक्रम होणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे, क्रीडा समालोचक सुनंदन लेले, डॉ.राजेश देशपांडे, साई पॅकेजिंगचे शंतनु प्रभुणे उपस्थित राहणार आहेत.