Cyclone | Image Used For Representational Purpose (Photo Credits: Wikimedia Commons)

भारतामध्ये अम्फान नंतर आता दुसरं 'निसर्ग' (Nisarga Cyclone) हे चक्रीवादळ धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. IMD च्या अंदाजानुसार अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आज अधिक गहिरा झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उत्तर महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरात (Gujrat) राज्याच्या दक्षिणेला त्याचा फटका बसू शकतो. हे चक्रीवादळ 3 जूनच्या संध्याकाळी किंवा रात्री पश्चिम किनारपट्टीजवळून पुढे सरकण्याचा अंदाज सध्या व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान या चक्रीवादळाचं नाव 'निसर्ग' असू शकतं. आणि हा कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळामध्ये बदलला तर जून महिन्यात महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात 129 वर्षांनंतर हे चक्रिवादळ राज्याच्या किनारपट्टीवर निर्माण होऊन धडकण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रामध्ये 1891 मध्ये पहिल्यांदा अरबी समुद्रामध्ये किनारपट्टीजवळ समुद्री वादळाची स्थिती निर्माण झाली होती. तर 1948, 1980 साली अशाप्रकारे समुद्रामध्ये डिप्रेशन म्हणजेच कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले होते. तुफान येईल अशी स्थितीदेखील निर्माण झाली होती मात्र कालांतराने ती विरून गेली.

दरम्यान अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा हा तुफानामध्ये बदलला गेला तर त्याचं नावं 'निसर्ग' असं ठेवलं जाईल. अद्याप त्याचं नामकरण करण्यात आलेलं नाही. जर कमी दाबाचा पट्टा सायक्लॉनिक तुफानामध्ये बदला तरच त्याचं नामकरण करण्याची पद्धत आहे. Mumbai Rains: मुंबई शहरात ढगाळ वातावरण, पावसाच्या हलक्या सरी; Nisarga चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा अलर्ट जारी.

 

ANI Tweet

हवामान खात्याने सध्याची स्थिती पाहता महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात मच्छिमारांना समुद्रामध्ये पुढील काही दिवस न जाण्याचा सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या 90 ते 100 किमी प्रतितास या वेगाने वारा वाहत आहे. भविष्यात हा वेग 110 होण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे.