Mumbai Rains: मुंबई शहरात ढगाळ वातावरण, पावसाच्या हलक्या सरी; Nisarga चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा अलर्ट जारी
Representational Image | (Photo Credits: PTI)

उकाड्याने त्रस्त असलेल्या अनेक मुंबईकरांसाठी आजची सकाळ अल्हाददायक होती. मुंबई शहरात आज पहाटे पावसाच्या सरी बरसल्याने वातावरणामध्ये थोडा गारवा निर्माण झाला आहे. मुंबई शहरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने उकाड्याने वैतागलेल्या अनेकांनी सुस्कारा टाकला आहे. सध्या अनेक मुंबईकर आनंदामध्ये आहेत. दरम्यान सध्या अरबी Nisarga चक्रीवादळाचा धोका वर्तवण्यात आला आहे.  अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र, गुजरात किनारपट्टीवर 3 जूनला वादळ धडकण्याची शक्यता

दरम्यान केरळमध्ये हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पावसाने हजेरी लावली आहे. आज केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याने अपेक्षेप्रमाणे पश्चिम किनारपट्टीला असणार्‍या महाराष्ट्रातील कोकण, मुंबई, पालघरला निश्चित त्याचा फायदा झाला आहे. Monsoon 2020: येत्या 3 आणि 4 जूनला मुंबई, ठाण्यासाठी ऑरेंज, तर पालघरमध्ये रेड अलर्ट जारी; हवामान विभागाची माहिती.   दरम्यान मुंबईकर नेटकर्‍यांनी मान्सून 2020 चे काही फोटो, व्हिडिओजदेखील सोशल मीडियामध्ये शेअर केले आहेत. आज सकाळी ट्वीटरवर देखील #MumbaiRains हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसला

मुंबईतील मान्सूनपूर्व सरींची बरसात

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये जूना महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून पूर्व सरी बरसतील. तर 11 जूनच्या आसपास मान्सूनचा पाऊस बरसू शकतो. सध्या पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाचा धोका असल्याने मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याचं आवाहन काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणार्‍या खाजगी संस्थेनेही पुढील काही दिवस पश्चिम किनारपट्टीसह महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचे राहतील असा अंदाज वर्तवला आहे.