Monsoon 2020: येत्या 3 आणि 4 जूनला मुंबई, ठाण्यासाठी ऑरेंज, तर पालघरमध्ये रेड अलर्ट जारी; हवामान विभागाची माहिती
Rainfall | Image used for representational purpose | (Photo Credits: @NarimanPatel/ Twitter)

Monsoon 2020: येत्या 3 आणि 4 जूनला मुंबई, ठाणे, रायगडसाठी ऑरेंज तर पालघरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासंदर्भात कुलाबा प्रादेशिक हवामान विभागाने माहिती दिली आहे. मुंबईकरांची लवकरचं वाढत्या उन्हाच्या झळांपासून सुटका होणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत मान्सून पूर्व पाऊस बरसणार आहे.

1 आणि 2 जूनला मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे. यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यातचं मुंबई आणि ठाण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामान विभागाने यांसदर्भात माहिती दिली आहे. (हेही वाचा - Monsoon 2020: वाढत्या उन्हाच्या झळांपासून लवकरच होणार मुंबईकरांची सुटका; अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत मान्सून पूर्व पाऊस बरसणार)

याशिवाय रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात 3 आणि 4 जूनला काही भागात जोरदार पाऊस होणार आहे. तसेच 1 ते 2 जून या कालावधीत रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात विजेच्या गडगडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार आहे. रायगड जिल्ह्यात 3 आणि 4 जूनला दरम्यान, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून रत्नागिरी, सिंधुर्दुर्ग जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.