Night Curfew (Photo Credits: ANI/Twitter)

महाराष्ट्रात आज (24 डिसेंबर) रात्रीपासून राज्य सरकारने जमावबंदी (Curfew In Maharashtra) लागू केली आहे. ही जमावबंदी रात्री 9 ते पहाटे 6 वाजेपर्यंत असणार आहे. राज्य सरकारने जारी केलेला जमावबंदी निर्णय आणि नियमावली याबाबत राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब यांनी राज्य विधिमंडळाच्या विधानसभा सभागृहात माहिती दिली. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे अधिवेशनातच याबाबत माहिती देण्यात आली.  अनिल परब यांनी सभागृहात वाचून दाखवलेल्या नियमावलीनुसार सामाजिक धार्मिक कार्यक्रमांना बंदिस्थ सभागृहात केवळ 100 लोकांच्या उपस्थितीस परवानगी असेल. तसेच, लग्नसमारंभी आणि इतर कार्यक्रमास केवळ 50 टक्के उपस्थितीस परवानगी आहे.

राज्य सरकारची जमावबंदी नियमावली

अनिल परब यांनी विधिमंडळ सभागृहात दिलेल्या माहितीनुसार, राज्यात लागू होत असलेल्या जमावबंदी नियावली खालील प्रमाणे.

  • राज्यातरात्री 9 ते पहाटे 6 वाजेपर्यंत जमावबंदी
  • विविध जिल्ह्यांमध्ये आवश्यकता तिथे निर्बंध
  • चित्रपटगृहं आणि उपहारगृहांना 50% क्षमतेत परवानगी
  • लग्नासाठी बंदिस्थ सभागृहात 100 जणांच्या उपस्थितीत परवानगी
  • स्पा, जीम आदींसाठी 50% उपस्थितीत परवानगी
  • विमान प्रवासाबाबतचे निकष केंद्र सरकार ठरवेल. केंद्र सरकारच्या निकषानुसार विमान प्रवासावर निर्बंध.

जगभरात कोरोना व्हायरस महामारीत (Coronavirus Pandemic) चिंतेचा विषय ठरली आहे. या चिंतेतून जग काहीसे सावरत असतानाच सुरुवातील 'डेल्टा' आणि त्यानंतर ओमायक्रोन (Omicron) हा कोविडचा नवाच स्ट्रेन पुढे आला. ओमायक्रोन स्ट्रेनच्या धोक्यातून सावरण्याठी जग वाट काढत असतानाच आता ‘डेल्मिक्रॉन’ (Delmicron) नावाचं सावट आले आहे. ओमायक्रोनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने सावधगिरीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा, Coronavirus Pandemic Update: जगासमोर Omicron नंतर Delmicron स्ट्रेनचा धोका, कोविड-19 महामारीने वाढवली नवी चिंता)

दरम्यान, ओमायक्रोन व्हायरस जगभरातील विविध देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात केंद्र सरकारने विविध राज्यांना खबरदारी घेण्यास बजावले आहे. त्यामुळे सन 2022 मध्येही जगाला कोरोनापासून मुक्ती मिळण्याची चिन्हे काहीशी कमीच आहेत.