NIA | (Photo Credit - Twitter/ANI)

राष्ट्रीय तपास संस्था अर्थातच एनआयएने (NIA) शनिवारी मुंबई आणि बेंगळुरू येथे अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. काही संशयितांचा जागतिक दहशतवादी संघटना ISIS आणि अल-कायदाशी संबंध असल्याची माहिती आणि संशय आल्याने एनआयएने ही शोधमोहीम राबवली. ज्या आरोपींबद्दल संशयास्पद माहिती मिळाली आहे ते सर्व आरोपींवर इस्लामिक स्टेट (IS) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कारवाया पसरवण्यासाठी आणि देशाची एकता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व धोक्यात आणण्यासाठी रचलेल्या कटाशी संबंधीत प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.

एनआयएने पाठिमागच्याच महिन्यात कर्नाटकात दक्षिण कन्नड, शिवमोग्गा, दावणगेरे आणि बेंगळुरू येथील शोध या सहा ठिकाणी शोध घेतला आणि शिवमोग्गा इस्लामिक स्टेट कट प्रकरणी कट प्रकरणाच्या संबंधात दोन व्यक्तींना अटक केली. दक्षिण कन्नड, शिवमोग्गा, दावणगेरे आणि बेंगळुरू येथे शोध घेण्यात आला. (हेही वाचा, Sanjay Biyani Murder Case: उद्योजक संजय बियाणी हत्या प्रकरणातील शार्प शूटर दीपक सुरेश रंगा एनआयएच्या ताब्यात)

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रह्मावर, उडुपी येथील वरंबल्ली येथील रेशान थाजुद्दीन शेख आणि कर्नाटकातील शिवमोग्गा येथील हुजैर फरहान बेग या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तपासात असे दिसून आले आहे की माझ मुनीर याने त्याचा जवळचा सहकारी आणि कॉलेजमित्र रेशान थाजुद्दीन याला कट्टरपंथी बनवले आणि दोन्ही आरोपींनी क्रिप्टो-वॉलेटद्वारे त्यांच्या ISIS हँडलरकडून निधी प्राप्त केला होता.

दरम्यान, आरोपंनी मोठ्या हिंसक आणि व्यत्ययवादी कटाचा एक भाग म्हणून काही ठिकाणी जाळपोळ केली. तसेच, वाहने, दारूची दुकाने, गोदामे आणि पॉवर ट्रान्सफॉर्मर यांसारख्या इतर आस्थापनांना लक्ष्य केले, असे तपास संस्थेने यापूर्वी सांगितले होते. हा गुन्हा सुरुवातीला 19 सप्टेंबर 2022रोजी शिवमोग्गा ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता, परंतु नंतर 15 नोव्हेंबर 2022 रोजी NIA द्वारे त्याची पुन्हा नोंद करण्यात आली.