Deepak Suresh Ranga | (Photo Credit - Twitter)

राज्यभर खळबळ उडवून दिलेल्या बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani Murder Case) हत्या प्रकरणातील शार्प शूटराल केंद्रीय तपास यंत्रणा (NIA) ने ताब्यात घेतले आहे. संजय बियाणी हे नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक होते. खंडणीसाठी त्यांची हत्या करण्यात आल्याचे आतापर्यंत झालेल्या तपासात पुढेआले आहे. दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा असे या हत्या प्रकरणाच्या मूख्य सूत्रधाराचे नाव आहे. हरविंदर सिंह याच्याच सांगण्यावरून दोन शार्प शूटरनी संजय बियानी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. बियाणी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोन शार्पशूटर पैकी मुख्य असलेल्या दीपक सुरेश रंगा (Deepak Suresh Ranga) याला नेपाळ बॉर्डरवर पकडण्यात आले.

संजय बियाणी यांच्यावर नांदेड येथील राहत्या घरासमोर 5 एप्रिल 2022 रोजी गोळीबार करण्यात आला होता. बियाणी यांच्या हत्येनंतरत राज्यभरात खळबळ उडाली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. हत्येमुळे हवालदील झालेल्या बियाणी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांत्वन केले होते. दरम्यान, नेपाळ बॉर्डरवर ताब्यात घेण्यात आलेल्या दीपक सुरेश रंगा याच्यावर देशभरात विविध राज्यांमध्ये सुमारे 25 गुन्हे दाखल आहेत. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांचा समावेश आहे. बियाणी यांच्या हत्येनंतर त्याच्यावर आता महाराष्ट्रातही गुन्हा दाखल झाला आहे. (हेही वाचा, Sanjay Biyani Murder Case: नांदेडमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू)

दरम्यान, बियाणी यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापण करण्यात आली होती. एसआयटीने राज्यासह देशभरारीत विविध राज्यांमध्ये तपास केला. आतापर्यंत या प्रकरणात 15 जणांना अटक झाली आहे. या सर्वांवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. इतक्या जणांना अटक होऊनही शार्प शूटर मात्र फरार होते. दरम्यान, त्यापैकी एका शूटरला गुजरात येथून अटक केली होती. जो सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. मोहाली बॉम्बस्फोट प्रकरणात तो पोलिसांच्या ताब्यात आहे.