राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांवर आजारपणाचं सावट आता असचं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या आठवड्यातचं राष्ट्रवादीचे सर्वोसर्वे शरद पवार (Sharad Pawar) यांना मुंबईतील (Mumbai) ब्रिच कॅंन्डी (Breach Candy Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पवारांवर येथे तीन दिवस उपचार केले जाणार होते पण डॉक्टरांनी प्रकृतीचा अंदाज घेता पवारांचा रुग्णालयातील मुक्काम वाढवला आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात आले आहेत. उपचार सुरु असताना देखील शरद पवारांनी थोड्या कालावधीसाठी का होईना पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास हजेरी लावत कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं. तेव्हा पवारांच्या हाताला पट्टी बांधलेली होती. मेळाव्यानंतर पवारांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन आज अखेर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तरी ब्रिचकॅंण्डी रुग्णालयातून ते आता त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवास्थानी मार्गस्थ झाले आहेत.
शरद पवारांनंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना देखील आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुजबळांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात (Bombay Hospital) दाखल करण्यात आले असुन त्याच्यावर उपचार सुरु करण्यात ले आहेत. गेले बरेच दिवसांपासून भुजबळांच्या तब्येतीत छोटी मोठी कुरबूर सुरुच होती. अनेक दिवसांपासून ते मास्कचा वापर करतानाही दिसतात पण आज भुजबळांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तसेच दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (हे ही वाचा:- Bharat Jodo Yatra In Maharashtra: कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेची आज महाराष्ट्रात एन्ट्री, पुढील 14 दिवस राहुल गांधी महाराष्ट्रात मुक्कामी)
राष्ट्रवादीचे दोन्ही महत्वाचे नेते आजारपणाच्या संकटात अडकले असले तरी विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) सध्या पक्षातील महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. तरी आजपासून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झालेल्या कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेला पाठींबा दर्शवत राष्ट्रवादी कॉंग्रेस या यात्रेत सहभागी होणार का असा प्रश्न सध्या राज्याच्या राजकारणात पडला आहे.