कॉंग्रेसची (Congress) कन्याकुमारी (Kanyakumari) पासून सुरु झालेले भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आज महाराष्ट्रात (Maharashtra) येवून ठेपली आहे. आजपासूल पुढील 14 दिवस ही यात्रा राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्वात महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार आहे. कन्याकुमारी ,तामिळनाडू ,कर्नाटक असा प्रवास केल्यानंतर ही पदयात्रा महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रवेश करणार आहे. महाराठवाड्यात कॉंग्रेसचं महत्व अधिक आहे त्यातही नांदेडमधील अशोकराव चव्हाणांची जागेला कुणी धक्का लावू शकणार नाही असा मतदार संघ. म्हणूनचं कदाचित राहुल गांधी नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. तरी राहुल गांधी नांदेड येथे बुधवारी जाहीर सभा घेणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वोसर्वे शरद पवार देखील याच दिवशी या यात्रएत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. तरी महाराष्ट्र कॉंग्रेसकडून शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी देखील या यात्रेत उपस्थित राहाण्याचं आमंत्रण दिलं आहे.

 

कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) ऐक्याचे दर्शन बघायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपच्या (BJP) बलाढ्य ताकतीचा सामना करायचा असल्यास कॉंग्रेसच्या (Congress) या भारत जोडो यात्रेचा मार्ग बऱ्याच पक्षाला सोयिस्कर वाटत आहे. तरी राज्यातील कुठले प्रमुख नेते या यात्रेत सहभागी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (हे ही वाचा:- Andheri Bypoll Result BJP: भाजपाने निवडणूक लढवली असती तर ऋतुजा लटकेंचा पराभव निश्चित होता, ठाकरे गटाच्या विजयानंतर भाजपची पहिली प्रतिक्रीया)

 

महाराष्ट्र कॉंग्रेस (Maharashtra Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अशोकराव चव्हान (Ashokrao Chavan) या नेत्यांचा भारत जोडो यात्रेत विशेष सहभाग असेल. राज्यातील या 14 दिवसांच्या भारत जोडो यात्रेची संपूर्ण जबाबदारी अशोकराव चव्हाणांकडे देण्यात आली आहे. तरी राज्यातील राजकारणावर भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येण्यावर काय परिणाम होतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.