प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Truebil)

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) वाशी (Vashi) यांच्या वतीने 12 सप्टेंबर रोजी सकाळी वाशी येथील एपीएमसी कार्यालयात कर न भरलेल्या वाहनांचा लिलाव होणार आहे. या लिलावात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आरटीओने केले आहे. यातील अनेक व्यावसायिक वाहने असून त्यांचा कर भरला नसून ती वाशी येथील आरटीओ कार्यालय संकुलात पडून आहेत. 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता एपीएमसी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात हा लिलाव होणार आहे.

मुंबई मोटार वाहन कायद्यांतर्गत, मोटार वाहन कर न भरणारी पर्यटक वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नवी मुंबई यांनी जप्त केली आहेत. थकबाकी भरल्यास वाहन परत घेता येऊ शकते. याबाबतची स्मरणपत्रे संबंधित वाहन मालकांना देण्यात आली होती, मात्र तरीही अनेकजण आपली वाहने घेऊन जाण्यास आले नाहीत. आता परिवहन प्राधिकरण या वाहनांचा लिलाव करणार आहे. शेवटी या वाहनांच्या थकबाकीदारांना लिलावाच्या तारखेपर्यंत कर भरण्याची संधी दिली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लिलाव करावयाच्या वाहनांची यादी माहितीसाठी एपीएमसीमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सूचना फलकावर लावण्यात आली आहे. तसेच लिलावासाठी उपलब्ध असलेली वाहने इच्छुक व्यक्तींना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय एपीएमसी धान्य मार्केट, सेक्टर क्र.19 बी टी ब्लॉक, गेट क्र.7 येथे पाहता येतील. लिलावाच्या अटी लिलावापूर्वी ऑनलाइन प्रकाशित केल्या जातील. सविस्तर माहितीसाठी संबंधितांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई येथे दूरध्वनी क्रमांक 022-27830701 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा: Mumbai Metro: मुंबई मेट्रोचं Western Express Highway junction वर इंटिग्रेशन सुरू)

दरम्यान, महाराष्ट्र मोटार कर अधिनियम, 1958 त्याचप्रमाणे महाराष्ट्र मोटार वाहन कर नियम, 1959 अन्वये महाराष्ट्र राज्यात वापरण्यात येणाऱ्या किंवा वापरासाठी ठेवलेल्या मोटार वाहनांवर, मोटार वाहन कर आकारण्यात येतो. शासन अधिसूचनेव्दारे वेळोवेळी विनिर्दीष्ट केलेल्या दराने कर वाहनधारकांकडून आकारण्यात येतो.