
नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये स्थानिक क्रिकेट मॅच (Cricket Match) च्या दरम्यान एक राडा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. दरम्यान विरोधी टीम मधून काहींनी शुल्लक कारणावरून मारहाण केल्याने 3 जण जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. Gondia Murder: आर्थिक व्यवहारातून तलवारीने वार करीत एका युवकाची हत्या; गोंदिया येथील घटना.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा मारहाणीचा प्रसंग रविवार, 17 जानेवारीचा आहे. नवी मुंबईतील कळंबोली भागात घडली आहे. मारहाण झालेल्यांनी केलेल्या तक्रारीवरून एफआयआर रजिस्टर करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी सोमवारी पाच जणांच्या विरोधात एक FIR दाखल केली आहे.
स्थानिक नगर सेवकाच्या टीमने रविवारी झालेला सामना जिंकला. या सामन्यानंतर दोन्ही संघांमध्ये बाचाबाची झाली. थोड्या वेळाने त्याचं पर्यावसन माराहाणीत झालं. रात्री 10 च्या सुमारास पराभूत झालेल्या संघाचे काही सदस्य मेडिकल स्टोअर मध्ये गेले. हे स्टोअर तीन भावांच्या मालकीचे आहे. हेच तीन जण विजेत्या टीमचे देखील भाग होते. त्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तिन्ही भावंडांना गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यानंतर त्यांना नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान त्यांच्या तक्रारीवरून विविध इंडियन पिनल कोड द्वारा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे 5 जणांच्या विरोधात आहेत. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही.