Gondia Murder: आर्थिक व्यवहारातून तलवारीने वार करीत एका युवकाची हत्या; गोंदिया येथील घटना
Representational Image (Photo Credits: PTI)

आर्थिक व्यवहारातून एका तरूणाची तलवारीने वार करीत हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गोंदिया (Gondia) शहरातील रामनगर पोलीस हद्दीत येणाऱ्या सह्योग रुग्णालयाच्या परिसरात गुरुवारी (14 जानेवारी) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे.ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.

रविप्रसाद बंबारे (वय, 34) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर, श्याम चाचेरे (वय, 35), शुभम परदेशी (वय, 33), प्रशांत भालेराव (वय, 40) आणि शाहरूख शेख (वय, 25) असे आरोपींची नावे आहेत. मयत आणि आरोपी एकमेकांचे मित्रच असून त्यांचा रेती विक्रीचा व्यवसाय होता. दरम्यान, पैशाच्या हिशेबावरून त्यांचात वाद निर्माण झाला होता. तसेच हा वाद विकोपाला गेल्याने आरोपीने रविप्रसादची निर्घृण हत्या केली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आरोपींनी रागाच्या भरात मृताच्या गळ्यावर 20  ते 25 वार केल्याचे या व्हिडिओतून समजत आहे.  हे देखील वाचा- Palghar: खळबळजनक! पालघर येथे सीए असलेल्या एका जेष्ठ नागरिकांची हत्या; पोलीस तपास सुरू

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपींच्याविरोधात भारतीय दंड विधयेक कलम ३०२ आणि कलम ३४ अंन्वये गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनमध्ये गुन्हेगारीच्या संख्येत मोठी घसर झाली होती. मात्र, पुन्हा एका गुन्हेगारीने वर डोके काढले आहे.