Sharad Pawar | (Photo Credits: Twitter/ ANI)

Maharashtra Rajya Sahakari Bank Fraud: येत्या 27 सप्टेंबर (शुक्रवार) रोजी अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात मी स्वत: उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Nationalist Congress Party President Sharad Pawar) यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार, अजित पवार आणि राज्यातील अनेक राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या पार्श्वभूमिवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पवार यांनी आपण अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात उपस्थित राहणार आहोत, तसेच या चौकशीला सर्व सहकार्य करणार असल्याचेही पवार या वेळी म्हणाले.

अंमलबजावणी संचालनालय कार्यालयाकडून अद्याप शरद पवार यांना कोणत्याही प्रकारे नोटीस आली नाही. तसेच, त्यांना चौकशीसाठीही बोलविण्यात आले नाही. त्यामुळे आपण स्वत:च अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात स्वत: हजर राहणार असल्याचेही पवार या वेळी म्हणाले आहेत. (हेही वाचा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा: शरद पवार यांच्याविरोधी कारवाईच्या निषेधार्थ मुंबईतील ED कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची निदर्शन)

एएनआय ट्विट

आजवर आपण दिल्लीच्या तख्तासमोर कधीच झुकलो नाही. दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचे संस्कार आमच्यावर झाले नाहीत. त्यामुळे दिल्लीच्या तख्तासमोर आपण कधीच झुकलो नाही, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई ही राजकीय हेतून प्रेरीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाची गेले अनेक दिवस चर्चा सुरु आहे. मात्र, शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, आनंदराव आडसूळ आदींसह महाराष्ट्रातील जवळपास 50 नेत्यांवर गुन्हा दाखल केला. हे गुन्हे दाखल होताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला.