महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा: शरद पवार यांच्याविरोधी कारवाईच्या निषेधार्थ मुंबईतील ED कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची निदर्शन
National Congress Party Supporters protest (Photo credit: ANI)

सक्तवसुली संचालनालयाकडून राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सक्तवसुली संचालनालयाने घेतलेल्या या निर्णयावर राष्ट्रवादीच्या समर्थकांनी नाराजी दर्शवली आहे. यामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या समर्थकांनी निदर्शन केले आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबधित बॅंकेशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच निवडणूकीच्या तोंडावर आली असून त्यांच्या दौऱ्याला मिळत असणारा प्रतिसाद पाहून सत्ताधारी पक्षाकडून डाव रचण्यात आला आहे, असे आरोप शरद पवार यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह काही नेत्यांवर आज गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करत आपल्यावर गुन्हा दाखल केल्याबाबत कल्पनाही नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. "मी कधीही कोणत्याच बँकेचा संचालक नव्हतो, किंवा या संबंधित बँकेशी माझे सदस्य म्हणूनही संबंध नव्हते. मग माझा कर्जवाटपाशी संबंध काय? हा सर्व प्रकार माझ्या दौऱ्याला मिळत असणाऱ्या प्रतिसादाकडे बघून विरोधकांकडून घडवण्यात आला आहे", असेही ते म्हणाले. यामुळे ईडीच्या या निर्णायावर राष्ट्रवादीच्या समर्थकांनी संताप व्यक्त करत ईडीच्या कार्यालयासमोर निरदर्शन करत आहेत. हे देखील वाचा- मराठवाड्याचा तरूण दादाराव कांबळे यांचे शरद पवारांसाठी खास अ‍ॅफिडेव्हीट; उभ्या आयुष्यात राष्ट्रवादीची साथ न सोडण्याची हमी स्टॅम्प पेपरवर.

ANI चे ट्वीट-

याआधीही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरें यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी ही मनसे समर्थकांनी ईडीच्या कार्यालयासमोर मोठ्यासंख्येने गर्दी केली होती. दरम्यान ईडीच्या कितीही चौकशी झाल्या, तरी सरकारच्या विरोधात आवज उठवणे बंद करणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते.