महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019( Maharashtra Assembly Election 2019) तोंडावर आली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे (National Congress Party) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) वयाच्या 79 व्या वर्षी एकटेच महाराष्ट्राच्या (Maharashtra) दौऱ्यावर गेले आहेत. तसेच पुन्हा पक्षाला नवी ऊभारी देण्यासाठी 'एकला चलो रे' ची हाक दिलेली दिसत आहे. शरद पवारांच्या भुमिकेचे सर्वांनाच कौतुक वाटत आहे. एकीकडे त्यांच्या पक्षातील लोक राष्ट्रवादीचा पक्ष सोडून शिवसेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तर दुसरीकडे एका विद्यार्थ्याने तर चक्क स्टॅम्पपेपरवरुन मरेपर्यंत शरद पवार यांची साथ देईल, असा विश्वास पवारांना आणि राष्ट्रवादीच्या पक्षाला दिला आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक निर्णय मार्गी लागले आहे. त्यातलाच एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा धाडसी निर्णय होता. आता त्याच विद्यापीठातील पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याने पवारांप्रतीचे प्रेम आणि निष्ठा पक्की असल्याचे उदाहरण राज्यासमोर ठेवले आहे. दादाराव जगन्नाथ कांबळे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. दादाराव याने औरंगाबाद येथे शरदपवार यांची भेट घेतली आहे. दादासाहेब याच्या भेटीने राष्ट्रवादी पक्षामध्ये अभिमानजनक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाकडून अरबी समुद्रामधील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा असल्याचा आरोप
NCP चे ट्वीट-
दादाराव जगन्नाथ कांबळे या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याने राष्ट्रवादी काँग्रेसला उभ्या आयुष्यात सोडणार नसल्याचा संकल्प केला आहे. एवढेच नव्हे तर,त्याने स्टॅम्प पेपरवर तसे शपथपत्र तयार केलेय. हे शपथपत्र त्याने नोटरी सुद्धा केलेले आहे. pic.twitter.com/WlGbXaNUE9
— NCP (@NCPspeaks) September 24, 2019
स्टॅम्पपेपरवर काय लिहले आहे?
"शरद पवार महाराष्ट्रासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार आहेत तर, मी ही शरद पवार यांच्याबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत असेल. कधीही पक्ष सोडणार नाही, असे एका स्टॅम्प पेपरवर लिहून दिले आहे. मी विद्यापीठातला एक संशोधक आणि आपला कार्यकर्ता आहे. साहेब आपल्या विचारांनी मी भारावून गेलो आहे. चहाच्या टपरीपासून ते खानावळीच्या खोलीत देखील मी आपला विचार आणि कार्य लोकांपर्यंत पोहचवतो", असे त्याने स्टॅम्पपेपरवर लिहिले आहे.
स्टॅम्पपेपरवरचा आशय वाचून शरद पवार अधिकच भावूक झाले आहेत आणि लगेच त्यांनी त्याच्या पाठीवर हात फिरवला. दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीकडे पाठ फिरवलीअसली तरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सदैव पवारांच्या सोबत असतील त्याचे हे मोठे उदाहरण आहे, असे म्हणता येईल.