Narhari Zirwal | (File Image)

Maharashtra Poltical Crisis :महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवण्याच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा (Latest Marathi Political News) आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायलायत सुनावणी झालेल्या प्रकरणावर आज निकाल येण्याची शक्ता आहे. पाठिमागील 11 महिन्यांपासून सुरु असलेल्या राजकीय सत्तासंघर्षाचा आज या निकालामुळे फैसला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात नेमके काय आहे याबाबत महारष्ट्रच नव्हे तर देशभरातून उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजूला राज्यातही अनेक घडामोडी घडत आहेत. राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) हे नॉट रिचेबल असल्याचे (Narhari Zirwal Not Reachable) वृत्त आहे. तसेच, ते नेमके कोठे आहेत याबाबतही निश्चित माहिती नसल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर महारष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी झाली. यात आमदारांची अपात्रता, राज्यपालांची भूमिका, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय यांसह इतरही विविध घटकांवर सविस्तर सुनावणी पार पडली. आरोप-प्रत्यारोप आणि दोन्ही बाजूंनी कायद्याचा किस पाडण्यात आला. अनेक नामवंत वकिलांनी या प्रकरणात बाजू मांडल्या. त्यामुळे केवळ महाराष्ट्र, देशच नव्हे तर आंरराष्ट्रीय पातळीवरही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता)

दरम्यान, राज्याच्या दृष्टीने इतके सगळे प्रकरण महत्त्वाचे असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे झिरवळांच्या मनात नेमके आहे तरी काय? याबाबत जोरदार उत्सुकता आहे. झिरवळ यांचे दोन्ही फोन नॉट रिचेबल आहेत. तसेच, नेहमी गावच्या घरी उपस्थित असलेले झिरवळ अचानक गायब कसे झाले याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. त्यांचे दोन्ही फोन बंद असल्याने विविध चर्चांना उधान आले आहे. शिवाय, राज्यातील सत्तासंघर्ष आणि 16 आमदारांच्या अपत्रतेविषयी प्रसारमाध्यमांसमोर बोलतानाही पाठिमागच्या काही कालावधीपासून झिरवळ हे टाळाटाळ करत असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. दरम्यान, एबीपी माझाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याबद्दल वृत्त दिले आहे.

नरहरी झिरवळ यांच्या आदेशामुळे एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची तलवार लटकली आहे. ज्यांचा फैसला कोर्टाकडून आज येऊ शकतो. अपात्रतेची टांगतील तलवार लटकत असलेले आमदार पुढीलप्रमाणे- एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील, रमेश बोरणारे.