Eknath Shinde vs Uddhav Thackeray | (Photo Credit: Archived, edited, representative images)

SC on Maharashtra Satta Sangharsh: अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज निकाल लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाशी संबंधीत प्रकरणात आज निकाल देण्याची शक्यता आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वतीने दोन्ही बाजूंनी कोर्टात जोरदार युक्तीवाद करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात ठाकरे, शिंदे आणि राज्यपाल यांच्या वतीने कोर्टात जोरदार बाजू मांडली. ही सुनावणी 16 मार्च रोजी पूर्ण झाली. आज या प्रकरणाचा निकाल होण्याची शक्यता आहे.

कोर्टात अपात्रतेची टांगती तलवार असलेले आमदार

एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

एकनाथ शिंदे, ब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील, रमेश बोरणारे. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली, काय घडलं कोर्टात?)

दरम्यान, राज्याच्या राजकारणात आजच्या निकालावरुन जोरदार चर्चा सुरु झाली आहे. राजकीय नेत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ..जय महाराष्ट्र!. अरविंद सांवत यांनी म्हटले आहे की, राज्याच्या प्रकरणात निवडणूक आयोग कसा वागला हे सगळ्यांनाच माहिती आहे. न्यायालयाच्या बाबतीत मात्र आम्हाला तसे काही वाटत नाही, संविधानाचे संरक्षण कोर्टाकडून होईल, असे सावंत यांनी म्हटले आहे.