नरेश म्हस्के, ठाणे शहराचे महापौर तर पल्लवी कदम यांची उप महापौर पदी बिनविरोध निवड
Thane Mayor and Deputy Mayor | Photo Credits: Twitter

मुंबई प्रमाणेच ठाणे महानगर पालिकेच्या महापौराची (Thane Mayor) निवडदेखील बिनविरोध करण्यात आली आहे. आज शिवसेनेचे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) ठाण्याचे महापौर तर पल्लवी कदम (Pallavi Kadam) या उप महापौर (Deputy Mayor) म्हणून बिन विरोध निवडून आल्या आहेत. आज (21 नोव्हेंबर) दोघांनीही आपल्या पदाचा भार स्विकारला आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आज ठाण्यामध्ये आले. त्यावेळेस एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरेंकडून नरेश मस्के आणि पल्लवी कदम यांचा गौरव करण्यात आला. Mumbai Mayor Election 2019: शिवसेना पक्षाकडून मुंबई महापौरपदासाठी किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब.

नरेश मस्के ठाणे महानगरपालिकेमध्ये यापूर्वी सभागृह नेते म्हणून काम करत होते. आता त्यांनी महापौरपदाचा कारभार स्वीकारला आहे. तर पहिल्यांदा ठाणे उपमहापौर पदावर पल्लवी कदम यांच्या रूपाने महिला विराजमान झाली आहे. काही दिवसांपूर्वीच म्हापौरपदाच्या सोडती जाहीर करण्यात आल्या आहेत.

शिवसेनेचे ट्वीट

ठाणे महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ पाहता महापौर शिवसेना पक्षाचा होणार, हे स्पष्ट होते. मात्र असे असले तरी महापौर आणि उपामहापौर या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करणार असल्याचे राष्ट्रवादी नेत्यांकडून सांगण्यात येत होते. दरम्यान शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्ष नेते कार्यालयात जाऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादीने निवडणुकीतून माघार घेतली आणि शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला.