महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यात 21 ऑक्टोबर रोजी विधासभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आणि या निवडणुकांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही राज्यांचे दौरे करणार आहेत.
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रात एकूण 9 प्रचार सभांना उपस्थित राहतील तर हरियाणामध्ये 4 सभांना आपली हजेरी लावणार आहेत.
Assembly polls: PM Modi to address 9 election rallies in Maharashtra, 4 in Haryana
Read @ANI Story | https://t.co/eDyYOcYHqy pic.twitter.com/GaJB8H0Gxg
— ANI Digital (@ani_digital) October 8, 2019
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची पहिली सभा 14 ऑक्टोबर रोजी होईल. प्रचारसभेदरम्यानचे मुद्दे जरी अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले तरी कलम 370 हटविणे, एअरस्ट्राइक व ट्रिपल तलाक हे मुद्दे यंदाच्या प्रचारात प्रामुख्याने पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मोदींसोबत भारतीय जनता पक्षाचे अनेक बडे नेतेही या प्रचार सभांना उपस्थित असण्याचे बोलले जात आहे. त्यात स्मृती इराणी, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ अशा मंडळींची नावे या यादीत असू शकतात.