
नंदुरबार (Nandurba) जिल्ह्यातील विरचक धरणात (Virachak Dam ) पोहायला गेलेली ४ मुलं बुडाल्याचे वृत्त आहे. ही मुलं ईद निमित्त सुट्टी असल्याने पोहायला गेली होती. अद्याप या मुलांचा काहीही तपास लागला नाही. या मुलांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
गेल्या काही दिवसांत पाण्यात बुडून मृत्यू घडल्याचे प्रकार वाढत आहेत. मृतांमध्ये खास करुन सुट्टीच्या दिवसात पोहायला गेलेल्या मुलांची संख्या अधिक आहे.
सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुलं धरण, विहिरी, नदी, तलाव आणि समुद्र किनारपट्टीवर पोहायला जातात. अनेकदा त्यांच्याकडे पालक असतात. तर बऱ्याचदा वर्षभर अभ्यास करुन थकलेल्या मुलांना आपल्या छंदासाठी आणि आपल्या आनंदसाठी काही वेळ मिळावा, असा विचार करुन पालकही मुलांकडे दुर्लक्ष करतात. (हेही वाचा, रायगड: मुरुड येथील फणसाड धरणात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू)
नवख्या ठिकाणी पोहण्यास, सुट्टीचा आनंद घेण्यास गेलेल्या मुलांवर पालकांनीच काळजीपूर्वक लक्ष ठेवायला पाहिजे. काळजी घेतल्याने काळजी करण्याचे आणि दुर्घटनांना सामोरे जाण्याचे प्रकार शंभर टक्के टाळता येत नसले तरी कमी करता येतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे असा सूर समाजातून उमटत आहे.