
रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील फणसाड धरणात पोहण्यासाठी गेलेले दोन सख्खा भाऊ बुडाल्याची घटना समोर येत आहे. आज दुपारी 12:45 च्या दरमान्य ही घटना घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोघेही भाऊ रोहा तालुक्यातील सारसोर्ली येथे राहणारे असून सुट्टीसाठी ते आत्याकडे बोर्लीमांडला येथे आले होते. गौरव बिरवाडकर आणि ओंकार बिरवाडकर अशी या दोन मृत भावांची नावे आहेत.
आज हे दोघे आपल्या नातेवाईकांसह फणसाड धरणावर पोहण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत 11 जण होते. धरणातून पोहून बाहेर येत असताना गौरव याचा तोल जाऊन तो खोलगट पाण्यात पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी गेलेला ओंकारही नंतर पाण्यात पडला आणि दोघंही पाण्यात बुडाले.
त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही बाहेर काढण्यात आले. मात्र दोघांचाही मृत्यू झाला होता. प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.