संपूर्ण महाराष्ट्र उन्हाचा तडाखा सहन करत असताना नागपूर मध्ये मागील 10 वर्षातील दुसऱ्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. नागपूरातील तापमान 47.5 डिग्री सेलियल्स आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दहा वर्षातील हे दुसरे उच्चांकी तापमान असून 65 वर्षातील हे पाचवे उच्चांकी तापमान आहे.
चंद्रपूरात मंगळवारी (28 मे) 47.8 डिग्री सेलियल्स तापमानासह विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. त्याचबरोबर नागपूर सह विदर्भातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यांपासून उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. (वाढत्या उन्हाळ्यात Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स)
भारतीय हवामान खात्याचे उप महानिर्देशक यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी नागपूरात 47.5 आणि 47.8 डिग्री सेलियल्सची नोंद झाली असून चंद्रपूरात काल उच्चांकी तापमान होते.
नागपूर आणि चंद्रपूर शिवाय विदर्भातील इतर जिल्ह्यांमधील तापमान:
# ब्रह्मापूरी- 46.9 अंश सेलियल्स
# वर्धा- 46.5 अंश सेलियल्स
# गडचिरोली- 46 अंश सेलियल्स
# अमरावती- 45.8 अंश सेलियल्स
# अकोला- 45.6 अंश सेलियल्स
# यवतमाळ- 45 अंश सेलियल्स
# बुलढाणा- 45 अंश सेलियल्स
येत्या दोन दिवसात नागपूर आणि चंद्रपूर मध्ये सर्वाधिक तापमान असेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
नागपूरमध्ये 1954 साली 47.8, 2003 मध्ये 47.7 तर 2005 मध्ये 47.6 डिग्री सेलियल्सची नोंद झाली होती. तर 2009 मध्ये 49 डिग्री सेलियल्स तापमानासह नागपूरात सर्वाधिक उच्चांक तापमान होते.