अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे. त्यासाठी लवकरच केंद्र सरकाला विनंती केली जाईल. परंतू, शेती प्रश्नावर आगोदर केद्रीय कृषीमंत्रालय (Ministry of Agriculture) आणि केंद्रीय अर्थमंत्रालय (Ministry of Finance) संपर्क साधून चर्चा केली जाईल. तिथे जर तोडगा निघाला नाही किंवा अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात येईल, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. गेली प्रदीर्घ काळ मी देशातील निर्णयप्रक्रियेच्या महत्त्वाच्या विभागांमध्ये काम केले आहे. त्यामुळे नेमके निर्णय कसे आणि कोठे होतात याबाबत मला नेमकी माहिती आहे, असे म्हणत पवार यांनी प्रसारमाध्यमांनाही टोला लगावला. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसंबंधी मदत मागण्यासाठी आपण पंतप्रधान शरद पवार यांच्याशी संपर्क साधणार का असा सवाल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला होता.
अवकाळी पावसामुळे झालेलं शेतीचं नुकसान, त्यामुळे शेतकऱ्याच्या मनात निर्माण झालेली भावना संमजून घेण्यासाठी शरद पवार हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. गेले दोन दिवस ते नागपूर (Nagpur) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. शेतकऱ्यांच्या नुकसाणीतून तोडगा काढण्यासाठी विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात सविस्तर चर्चा करण्यात यावी. तसेच, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी एक बैठक घ्यावी. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने मदत करावी यासाठी प्रयत्न करेन असे पवार म्हणाले.
अवकाळी पावसामुळे नागपूरमध्ये शेतकऱ्यांचे खास करुन संत्रा उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसाण झाले आहे. अवकाळी पावासमुळे संत्र्याला गळ नावाचा रोग झाला आहे. त्यामुळे संत्र्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच्यावर काही उपाययोजना करावी लागेल. संत्रा उत्पादकासोबतच हरभरा,धान, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे, असे पवार म्हणाले. (हेही वाचा, पुढचे 25 वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहावा ही इच्छा, पण आम्ही 'पुन्हा येईन..पुन्हा येईन' म्हणणार नाही: संजय राऊत)
शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची संपूर्ण पाहणी तपशिलवार केली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीत हा तपशिल बारकाईने पाहायला मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ 33 टक्क्यांपेक्ष अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचाच पंचनामा करण्यात आला आहे. या आकडेवारून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे पुढे येत आहे. 7361 हक्टर शेतीचे क्षेत्र बाधीत झाल्याचे पाहायला मिळत असल्याचे पवार यांनी सांगितले.