Nagpur: नागपुरात धक्का लागण्याच्या कारणावरुन डॉक्टरला तीन तरुणांकडून मारहाण
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

Nagpur: सरकारी विभागातील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मधील एका डॉक्टरला तीन तरुणांनी धक्का लागला म्हणून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याबद्दल नागपूर पोलिसांनी माहिती दिली आहे. डॉ. सागर मदन पांडे (38) असे डॉक्टरांचे नाव असून ते रुग्णालयातून आपल्या घरी जात असताना हा प्रकार घडला आहे.(Maharashtra: मेळघाटात गेल्या 15 दिवसात 14 मुलांचा मृत्यू, ठाकरे सरकारने दाव्याचे केले खंडन)

आरोपी हे गांजीपथ परिसरातील रस्त्यावर गोंधळ घालत होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या या वागण्यावरुन आक्षेप घेतला. यावरुन संतप्त झालेल्या तिघांनी डॉक्टरला मारहाण केली. आरोपींच्या विरोधात विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(पुण्यात अल्पवयीन मुलीवरील अतिप्रसंगाची घटना लाजीरवाणी आणि संतापजनक- उपमुख्यमंत्री अजित पवार)

दरम्यान, मंगळवारी रात्री आरोपी याचा वाढदिवस असल्याने त्याच्या मित्रांसोबत केक कापत त्यांचे रस्त्यावरच नाचगाणे सुरु होते. तर डॉ. पांडे हे पार्क करण्यात आलेल्या गाडीतून आपले सामान बाहेर काढत होते. त्याचवेळी पांडे यांना आरोपींचा धक्का लागला. तेव्हा पांडे यांनी त्यांना त्यावरुन तुम्हाला दिसत नाही का असे सांगत नाचगाणे थांबवण्यास सांगितले. यावरुनच संतापलेल्या तिघांनी डॉ. पांडे यांना शिविगाळ करत त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर एका अल्पवयीन सूचनापत्र देत सोडून दिले आहे.