Representational Image (Photo Credits: PTI)

नागपूर (Nagpur) मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. हेल्थ केअर प्रॉडक्ट (Health Care Product Company) विकणाऱ्या कंपनीच्या एका ऑफिसमधील सफाई कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. लक्ष्मण मलिक (65) असे या मृत व्यक्तीचे नाव असून एका अज्ञात इसमाने गळा चिरुन त्यांची हत्या केली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Thane: कल्याण मधील वृद्ध महिलेची गळा चिरुन हत्या, कारण अद्याप अस्पष्ट असल्याने पोलिसांकडून अधिक तपास सुरु)

गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकासमोर रजत संकुल या बहुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हेल्थ केअर प्रॉडक्ट कंपनीचे ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये लक्ष्मण मलिक सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते. (Mumbai: वडील आणि आजोबांवर चाकूहल्ला करुन 20 वर्षीय तरुणाची आत्महत्या; कुटुंबियांवर शोककळा तर परिसरात खळबळ)

विशेष म्हणजे ऑफिस बंद झाल्यावर ते तिथेच राहायचे. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी ऑफिसचे कर्मचारी निघून गेल्यावर तो ऑफिसमध्येच थांबला. दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी 10.15 वाजता ऑफिस उघडल्यानंतर मलिक यांचा मृतदेह रक्ताचा थारोळ्यात पडलेला दिसून आला. त्यांचे हात मागे बांधलेले होते आणि गळ्यावर कैची किंवा धारदार शस्त्राने वार केल्याच्या खूणा होत्या.

त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. ठसे तज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी बोलावून पाहाणी करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीचा शोध अद्याप सुरु आहे.