
वडील आणि आजोबांवर चाकूने हल्ला करुन 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील (Mumbai) मुलुंड (Mulund) येथून समोर येत आहे. या घटनेने कुटुंबियांवर शोककळा पसरली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र या तरुणाने इतके टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्नाचे गुढ अद्याप सुटलेले नाही. वडील आणि आजोबांवर चाकू हल्ला केल्याने तरुणाने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. शार्दुल मिलिंद मांगले (20) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून त्याने केलेल्या चाकूहल्ल्यात वडील मिलिंद सुरेश मांगले (55) आणि आजोबा सुरेश केशव मांगले (85) यांचा मृत्यू झाला आहे. (Thane: कल्याण मधील वृद्ध महिलेची गळा चिरुन हत्या, कारण अद्याप अस्पष्ट असल्याने पोलिसांकडून अधिक तपास सुरु)
मुलुंडमधील लाल बहादूर शास्त्री मार्गावर असलेल्या वसंत ऑस्कर सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली. इमारतीखाली एक तरुण जखमी अवस्थेत पडल्याचे आढळले. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी शार्दुलला मुलुंडमधील अग्रवाल हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या वडील आणि आजोबांनाही अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचाही मृत्यू झाला. दरम्यान, तरुणाचं मानसिक संतुलन बिघडल्याची माहिती पोलिस चौकशीत समोर आली. (Washim: धक्कादायक! गाडी लावण्याच्या क्षुल्लक कारणांवरून एका तरूणाची चाकू भोसकून हत्या; वाशिम येथील घटना)
हत्या आणि आत्महत्या या दुहेरी प्रकरणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळाची पाहाणी केली असून या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.