 
                                                                 Nagpur Accident: राज्यात रस्ते अपघात थांबायचे नावचं घेत नाही दरम्यान नागपूर (Nagpur) शहरातील पांचपावली पुलावर भीषण अपघात झाल आहे. टेम्पोची जोरदार धडक एक दुचाकीला लागल्याने दुचाकी स्वराचा मृत्यू (Death) झाला आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडला आहे. या घटनेनंतर टेम्पोचालक पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलिसांनी पुढील चौकशी सुरु केली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारीच्या सकाळी तरुणी दुचाकीवरून कामानिमित्त घराबाहेर पडली होती. पूजा गजानन काठीवाले असं मृत तरुणीचे नाव आहे. दरम्यान,पांचपावली पुलावर जाताना एका टेम्पोने (क्र. डीडी.01 क्यू. 9740) तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत पूजा गंभीर जखमी झाली. अपघातानंतर जमावांनी तिला मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (हेही वाचा-दादर येथे दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या इंजिनची एकमेकांना टक्कर)
तरुणी गंभीर अवस्थेत पडली असतना टेम्पोचालक घटनास्थळावरून फरार झाला. पूजाच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच त्यानी रुग्णालय गाठलं. त्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन टेम्पोचालकाविरोधात पोलिस तक्रार दिली. याप्रकरणी टेम्पो चालकावर कठोर कारवाई करा अशी मागणी कुटुंबियांनी केली. तरुण मुलीच्या मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुख:चे डोंगर कोसळले आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
