मुंबईच्या दादर येथे रेल्वेचे एक अपघात झाला आहे. या ठिकाणी प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या इंजिनची एकमेकांना टक्कर झाल्याची माहिती मिळत आहे. गदग एक्सप्रेस आणि पॉंडीचेरी एक्सप्रेस एमेकांवर आदळता आदळता थोडक्यात बचावल्या आहेत. 11005, पुडुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे मुंबईतील दादर स्थानकावर रुळावरून घसरले, या अपघातामध्ये सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे काही वेळासाठी वाहतुक विस्कळीत झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)