नाशिक येथे हल्लेखोरांकडून व्यावसायिकाची हत्या, घातला सहा लाखांचा गंडा
फोटो सौजन्य - PTI

नाशिक (Nashik) येथे काही अज्ञात व्यक्तींकडून व्यावसायिकाला रस्त्याच लूटून सहा लाखांचा गंडा घातला. त्यानंतर आरोपींनी या व्यायवसायिकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अविनाश शिंदे असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. अविनाश यांचे सुपर ग्राहक बाजार येथे मिनी सुपर मार्केटचे दुकान आहे. रात्रीच्या वेळेस अविनाश हे दुकान बंद करुन घरी जाण्यास निघाले असताना त्यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. अविनाश यांच्या जवळ असलेली पैशांची बॅग हिसकावण्याचा ही प्रयत्न करत होते. परंतु हल्लेखोरांना विरोध करण्यासाठी पुढे सरसावले तेव्हा हल्लेखोरांनी अविनाश यांच्यावर धारधार शस्राने हल्ला केला.

या प्रकरणी अविनाश गंभीर जखमी झाले. परंतु उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींचा शोध तपास करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले जात आहे.