Murder प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

Nagpur Murder Case: नागपूर जिल्ह्यात दोन तरुण व्यापाऱ्यांचे क्रूरतेने हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस याघटनेची चौकशी करत आहे. दोन दिवसांपुर्वी अपहरण झालेले या दोघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वर्धा नदीत आढळून आले आहे. पोलिसांनी या घटनेतील पाच आरोपींना बेड्या घातल्या आहेत. 50 लाखांची सुपारी घेवून या दोघांची हत्या करण्यात आली. अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.  फार्महाऊसवर बोलवून गोळी घालून त्यांची हत्या केली आणि मृतदेहाची विलेवाट लावण्यासाठी वर्धातील नदीत फेकले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांना दीड लाखांचा गंडा लावला आणि पैसांचे आमिष दाखवत त्यांनी फार्महाउसवर बोलवले. निराला कुमार सिंह (वय 43) आणि अंबरीश देवदत्त गोळे (वय 41) अशी खून झालेल्या व्यापाऱ्यांची नावं आहेत.  पैसांचे आमिष दाखवत आरोपींना दोघांना पण फसवूण फार्महाऊसवर बोलवले. दोन दिवस झाले तरी  व्यापारी घरी परतले नाही म्हणून कुटूंबियांनी पोलिसात 25 जुलै रोजी तक्रार दाखल केली. आरोपींनी आपली  मोठी ओळख राजकराण असल्याचे खोटा दावा केला. विशाल पुंज नावाच्या व्यक्तीवर कूटूंबाने संशय व्यक्त केला. पोलिसांनी या प्रकरणात दखल देत त्यांनी आणखी एका आरोपीला या घटनेच्या समोर आणले.

तलमले यानं सर्वप्रथम गोळे आणि सिंह यांच्याशी पुंज याच्या माध्यमातून संपर्क साधला अशी माहिती पोलिसां कडून मिळाली.  खोटे दावे करत दोघांना जाळ्यात अडकवले. त्यांना दीड कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट देण्यास सांगितलं. त्या बदल्यात अल्पावधीतच त्यांना 2.80 ते 3 कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलं. लकी तुर्केल या फार्महाउसवर त्यांची भेट ठरली.  फार्महाउसवर गेल्यावर तलमले आणि दोन्ही व्यापाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी बेसावध असलेल्या गोळे आणि निराला सिंहवर वर्मा आणि तलमले यांना बंदूकीने गोळ्या झाडून मारून टाकले नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला परंतू मृतदेह अर्धवट जळला आणि त्याच अवस्थेत मृतदेहाची विलेवाट लावण्यासाठी वर्धा नदीत फेकला. गुरुवारी नागपुरमधून तलमले नावाच्या आरोपीला पोलिसांनी बेड्या घातल्या.