central railway mumbai | (Photo credit: archived, edited, representative image)

Mumbai: आठवड्याचा पहिलाच दिवस मुंबईकर चाकरमाणी कामावर निघाला असताना मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे ( Central Railway) साधारण 20 ते 25 मिनिटे उशीरा धावत असल्याची माहिती आहे. रेल्वे वाहतुकीस विलंब होण्याचे नेमके कारण काय याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, कोपर रेल्वे स्टेशन (Kopar Railway Station) नजीक रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

सकाळची वेळ म्हणजे मुंबईकरांचा ऑफीस आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडण्याची वेळ. नेमकी याच वेळी वाहतूकसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या मुंबईकर (Mumbaikar) प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांची अडचण झाली असून, त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे तो वेगळाच. (हेही वाचा, Railway Recruitment 2019: मराठी पोरांनो, रेल्वे भरती निघतेय! लक्ष ठेवा, परप्रांतीय घुसतील; राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश)

दरम्यान,बिघाड दूर करुन वाहतुक सेवा सुरळीत सुरु करण्यासाठी रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या पथकाने दुरुस्तीचे कामही सुरु केले असे सांगितले जात आहे.