MNS chief Raj Thackeray | (File / Photo credit: Twitter)

Railway Recruitment 2019: पुढील काही महिन्यांमध्ये रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती निघणार आहे. महाराष्ट्र रेल्वे भरती (Recruitment of Maharashtra Railway) प्रक्रिया राबवली जात असताना मराठी मुलांनाच प्राधान्य मिळायला हवे. मुंबई आणि महाराष्ट्रात होणाऱ्या रेल्वे भरतीवर मराठी मुलांचाच हक्क आहे. त्यामुळे या भरतीवर लक्ष ठेवा. नाहीतर या भरतीत परप्रांतीय घुसतील तुमच्या जागा पटकावतील. लक्ष ठेवा, असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

आगामी काळात हजारो पदांसाठी रेल्वे भरती निघेल असे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. हाच आधार घेत राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी मराठी तरुणांनी रेल्वे भरतीचा लाभ घेण्याचे अवाहन केले आहे. तसेच, भरती प्रक्रियेवरही लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

राज ठाकरे यांनी काय म्हटलं आहे फेसबुक पोस्टमध्ये?

'रेल्वेभरतीत मराठी मुलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २००८ साली एक मोठं आंदोलन उभारलं होतं. त्या आंदोलनाचा परिणाम असा की पुढे रेल्वे भरतीच्या परीक्षांच्या जाहिराती स्थानिक वृत्तपत्रात येऊ लागल्या, आणि त्या त्या राज्यातील स्थानिक भाषेत परीक्षा देणं आणि नोकरीत निवड होण्यासाठी स्थानिक भाषा येणं सक्तीचं केलं गेलं. हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचा विजय होता'. (हेही वाचा, राज ठाकरे यांचा 19 मार्चला मुंबईत मेळावा, राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची घोषणा करणार?)

राज ठाकरे फेसबुक पोस्ट

आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे पुढे म्हणतात, 'आता पुन्हा मोठ्या प्रमाणावर रेल्वे भरती आहे. ह्या रेल्वे भरतीचा फायदा माझ्या मराठी तरुण-तरुणींनी घ्यायलाच हवा. पण त्यासाठी फॉर्म कसा भरावा, तयारी कशी करावी ह्याचं मार्गदर्शन पण त्यांना व्हायला हवं. ह्याच उद्देशाने माझे पक्षातील सहकारी अभिजित पानसे ह्यांनी एका तज्ज्ञांची मुलाखत घेतली आहे. त्याचा हा दुवा'. (या मुलाखतीचा दुवा व्हिडओसत पाहायला मिळेल.) (हेही वचा, रेल्वे भरती, सरकारी नोकरी: RRB, IRCTC आणि Northern Railway मध्ये तब्बल 1 लाख 30 हजार जागा)

रेल्वे भरती प्रक्रिया माहिती आणि मार्गदर्शन करणारा मनसे निर्मित व्हिडिओ

दरम्यान, या भरतीत बाहेरचे घुसणार नाहीत आणि फक्त महाराष्ट्रातील मुला-मुलींनाच नोकरी मिळेल ह्याकडे महाराष्ट्र सैनिकांनी लक्ष ठेवावं, असे आदेशही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.