Mumbai Weather | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज 24 ते 32 अंश सेल्सिअस इतके तापमान पाहायला मिळू शकते. त्यासोबतच ढगाळ वातावरणासह आज आणि पुढचे आठवडाभर हलका ते रिमझीम पाऊस (Light Rain or Drizzle) उपस्थिती दर्शऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभाग (India Meteorological Department) अर्थातच आयएमडीने (IMD) वर्तवला आहे. त्यामुळे उद्याचे हवामान (Tomorrow's Weather in Mumbai) आजसारखेच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) 105.0 वर आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

मुंबई शहर उपनगरांसाठी या आठवड्याचे हवामान कसे राहील?

  • 20 सप्टेंबर: सायंकाळच्या वेळी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस. तापमान 24 अंश सेल्सिअस ते 33 अंश सेल्सिअस आणि ढगांच्या गडगडाटाची शक्यता.
  • 21 सप्टेंबर: हलका ते रिमझीम पाऊस अपेक्षीत, तापमान 25 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान, आकाश सामान्य: ढगाळ.
  • 22 सप्टेंबर: ढगाळ आकाश आणि हलक्या पावसाची शक्यता, तापमान 25 अंश सेल्सिअस ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान.
  • 23 ते 24 सप्टेंबर: वावसाची संततधार अपेक्षीत. तापमान 26 अंश सेल्सिअस आणि 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असल्याने वातावरणात गारवा जाणवेल.

महाराष्ट्रात पाऊस पुनरागमनाच्या तयारीत

गणेशोत्सव काळात पावसाने काहीशी हजेरी लावली असली तरी मधल्या काळात पावसाने पूर्ण विश्रांती घेतली होती. दरम्यान, आता पावसासाठी अनुकुल स्थिती निर्माण झाल्याने पाऊस महाराष्ट्रात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. हवामानाची स्थिती विचारात घेऊन मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आयएमडीने यलो अलर्ट जारी केला आहे. झारखंड आणि छत्तीसगड राज्यांमध्ये हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पावसासाठी अनुकुल वातावरण निर्मिती झाली आहे. खास करुन पुढचे दोन दिवस विदर्भामध्ये वरुन राजा उपस्थिती दर्शवू शकेल. शिवाय, मराठवाड्यात पाऊस हळूहळू वाढल्याचे पाहायला मिळू शकते. (हेही वाचा, Mumbai Weather: राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी, सोमवारनंतर पावसाचा जोर ओसरणार)

मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक

दरम्यान, मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता 105.0 वर आहे. त्यामुळे लहान मुले, म्हातारी माणसे, रुग्ण, गर्भवती स्त्रिया आणि आजारी किंवा प्रकृती अस्वास्थ्याने झुंजत असलेला तरुण वर्ग यांनी काळजी घेणे अपेक्षीत आहे. या वर्गातील लोकांनी शक्यतो बाहेरच्या वातावरणात जाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवले पाहिजे. स्वच्छ हवा मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. अन्यथा त्यांना श्वससनाशी संबंधीत विविध त्रासांचा सामना करावा लागू शकतो. महत्त्वाचे म्हणजे पुढचे किमान आठवडाभर तरी शहर आणि उपनगरातील हवेची गुणवत्ता सर्वसाधारण सारखीच राहणार असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.