Mumbai Weather Prediction, July 24: IMD ने मुंबई, उपनगरे आणि ठाणे शहरात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मंगळवारी म्हणजे आज मुंबई आणि ठाण्यात यलो अलर्ट, तर बुधवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात आठवड्याभरापासून जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. काल सोमवारीही पावसाचा जोर कायम होता. हवामान खात्याने सोमवारी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट(Orange Alert) जाहीर केला होता. त्यामुळे गेल्या 24 तासांमध्ये मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. पण मात्र आज सकाळपासून मुंबईत पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळाले.पण मात्र उदय मुंबईत हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे व मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने मुंबईत उद्याचे हवामान जारी केले आहे.हेही वाचा: Ratnagiri Flood Situation: कोकणात मुसळधार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती

मुंबईत उद्याचे हवामान कसे?

रत्नागिरी जिल्ह्यात सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. शनिवार मध्यरात्रीपासून पावसाचा आणखी जोर वाढल्याने लांजा तालुक्यातील मुचकुंदी, राजापूरमधील काजळी नदी, चिपळूणमधील वाशिष्टी नदी, खेडमधील जगबुडी नदी आणि संगमेश्वरमधील शास्त्री या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर शहर आणि रत्नागिरीतील चांदेराई बाजार पेठेत पाणी भरल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.