Mumbai Weather Forecast For Tomorrow : मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Mumbai Weather Prediction, July 12 : हवामान खात्याने मुंबई आणि ठाणेसाठी आजपासून शनिवारपर्यंत 'यलो अलर्ट' जारी केला आहे.मुसळधार पावसाने मुंबईतील सामान्य जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर काही दिवसांनी, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) 15 जुलैपर्यंत कोकण पट्टीत जोरदार वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दोन दिवसांपूर्वी, मुंबई आणि आजूबाजूच्या भागात संततधार पावसाने उपनगरीय रेल्वे सेवा आणि विमान सेवा विस्कळीत केल्याने महानगरातील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबईतील काही भागात अवघ्या सहा तासांत 300 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला, त्यामुळे रस्ते आणि सखल भागात पाणी साचले, शाळा आणि महाविद्यालये बंद राहण्यास भाग पाडले.भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज 11 जुलै रोजी मुंबईत किमान तापमान 27 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज मुंबईत ढगाळ वातावरण राहील आणि दिवसभर मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान विभागने मुंबईत उद्याचे हवामान कसे ह्याच अंदाज लावला आहे. हेही वाचा: Mumbai Weather Prediction Today: मुंबई मध्ये पुढील 3-4 तासांत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईत उद्याचे हवामान कसे?

हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी  पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे