Mumbai University (Photo Credits- Facebook)

मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) विधी शाखेच्या पाचव्या सेमिस्टर परिक्षेला एक विद्यार्थिनी उपस्थित राहून सुद्धा गैरहजेरी लावल्याचा प्रकार घडला आहे. तसेच उत्तरपत्रिका तपासली न गेल्याने शून्य गुण दिले असल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे.

काजल पाटील असे या विद्यार्थिनीचे नाव असून पीआयएल या विषयाची उत्तरपत्रिका तपासली नसल्याने शून्य गुण देऊन नापास केले आहे. त्यामुळे याबद्दल काजल हिने विद्यापीठात चौकशी केली असता परिक्षेला गैरहजर असल्याचा शेरा देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. तसेच परिक्षेला उपस्थित असल्याचा पुरावे सादर करुन उत्तरपत्रिका पुन्हा तपासणीसाठी देऊ नये असे परिक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा येण्यास सांगुन तिचा अर्ज पुर्नतपासणीसाठी दिला असल्याचे काजलने म्हटले आहे.(हेही वाचा-मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांनी परिक्षेला बसूनही लावली गैरहजेरी, विद्यार्थ्यांमध्ये संताप)

या सर्व प्रकारामुळे काजल सारख्या विद्यार्थ्यांचे नुकासान होते. यापूर्वीसुद्धा अशा पद्धतीचे प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. तर आता विद्यापीठाच्या प्रशासनाने याबद्दल लवकरच निकाल देण्यात येईल असे म्हटले आहे.