
मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) काही विद्यार्थी परिक्षेस उपस्थित राहिले असूनही गैरहजेरी लावत नापास केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठाविरुद्ध संताप निर्माण होत आहे.
गिरगाव (Girgao) येथील भवन्स कॉलेजच्या (Bhavans College) विज्ञान शाखेच्या पाचव्या सत्राची परिक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी नऊ विद्यार्थ्यांना गैरहजर ठरवत नापास केल्याचा विद्यापीठाचा कारभार उघडकीस आला आहे. तसेच नापास केलेल्या विद्यार्थ्यांनी निकालानंतर एटीकेटी परिक्षा दिली. त्यावेळी ते अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे पुन्हा एका विद्यार्थ्यांनी एटीकेटी परिक्षा दिली तेव्हा हे सर्व विद्यार्था गैरहजर असल्याचे सांगत त्यांना नापास करण्यात आले. मात्र पत्रक आणि हॉल तिकिटावर शिक्षकांची सही असून ही असा प्रकार घडला आहे. त्यामुळे भवन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी याबद्दल मुंबई विद्यापीठाकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
तर विद्यार्थ्यांच्या या मागणीवर विद्यापीठाने उत्तर दिले असून दोन दिवसात याबाबत कळवू असे सांगितले आहे. हा प्रकार बबलिंगमुळे झाला असल्याचे मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव विनोद माळाळे यांनी म्हटले आहे.