Local Train | Representational Image | (Photo Credits: File Photo)

कळवा येथील वाहनांसाठी असलेले रेल्वे फाटक सुरु राहिल्या कारणाने कल्याण-ठाणे (Kalyan-Thane) रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. या महत्वाच्या रेल्वेमार्गावर सकाळच्या वेळी रेल्वेसेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे अतिशय हाल होत आहेत. कळवा येथील फाटक बराच वेळ सुरु राहिल्याकारणाने मध्य रेल्वेचे वाहतूक ठप्प झाल्याचे सूत्रांकडून कळते आहे. या फाटकामुळे कल्याण-ठाणे धीम्या मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. बुधवारीही याच कारणामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती.

कळवा येथे सकाळी रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने सकाळी 10:45 ते 11 वाजेपर्यंत कळवा रेल्वे फाटक उघडे राहिल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे मध्य रेल्वेवरील कल्याण आणि ठाणे दरम्यानची लोकल वाहतूक विस्कळीत झाली.  कळवा येथील रेल्वे क्रॉसिंगचा मुद्दा गेल्या 10 वर्षांपासून रखडलेला आहे. त्यामुळे त्यावर योग्य तो तोडगा न काढल्याने रेल्वे प्रवाशांना नाहक या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

मुंबई रेल्वे प्रवासी प्रतिक्रिया:

हेही वाचा- कसारा स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, कल्याण डोंबिवली स्थानकात प्रवाश्यांची गर्दी

या मार्गावरील रेल्वे सेवा सुरळीत होण्यास थोडा वेळ लागणार असून आधीच या मार्गावर रखडलेल्या रेल्वे धीम्या गतीने सुरु करण्याचे रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.